नंदीग्राम (नांदेड) - कविता
नंद राजाचे मूळ ,आहे तीर्थ गोदातीर
वाहे पुण्य प्रवाह ,करी शुद्ध सान थोर
गोदेचा तो निर्मळ पाट ,जनी उल्हासाचे घाट
पुण्य स्नान पूजेसाठी ,संत चालती ही वाट
संस्कृत भाषेची महती,सांगे वामन पंडित
गुरु गोबिंद येथेच ,विलीन चिरशांत
शंकर सागर तो राजा, राज्य चालवले थोर
जल संस्कृती पूजक, प्रजा सारी बिनघोर
सहस्रकुंड जलप्रपात ,राष्ट्रकुटांचा भुईकोट
सिद्धेश्वर,हजरत ,उनकदेव,दत्तमठ
विष्णूकव,दासगणू ,नेरलीचे कुष्ठधाम
क्षेत्रपती परमेश्वर ,तटावरी काळेश्वर
सिद्धेश्वर,हजरत ,उनकदेव,दत्तमठ
विष्णूकव,दासगणू ,नेरलीचे कुष्ठधाम
क्षेत्रपती परमेश्वर ,तटावरी काळेश्वर
ज्ञानतीर्थ परिसरी ज्ञान वर्षे विदयापीठ
समर्थ राष्ट्रासाठी ,उभे होती इथे रठ्रृठ
मुक्तीगाथा अन सवे नरहरांची गोड वाणी
जन सारे गावोगावी ,गाती खंडोबाची गाणी
आदीग्रंथाचे पठण रोज करी शाीख जाट
मौलवीही रोज सांगे ,चाला अल्लाह ची वाट
पीठ पुर्ण रेणूकेचे ,भूमी बुद्ध बाबरीची
काय वर्णावी थेारवी ,नंदीग्राम नगरीची.
मौलवीही रोज सांगे ,चाला अल्लाह ची वाट
पीठ पुर्ण रेणूकेचे ,भूमी बुद्ध बाबरीची
काय वर्णावी थेारवी ,नंदीग्राम नगरीची.
- डी. के. पिन्नलवार